Ticker

6/recent/ticker-posts

तालुक्यातील आदिवासी लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून वंचित


पोभुर्णा : तालुक्यातील आदिवासी लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून मागील पाच महिन्यांपासून वंचित असल्याने अनुसूचित जमाती लाभार्थ्यांची वाताहात होऊन उपासमारीची वेळ आली आहे.

केंद्र सरकारने अलीकडच्या काळात आर्थिक दृष्ट्या दृबर्ल, अपंग, निराधार,विधवा, सिकलसेल इत्यादी लोकांना संजय गांधी निराधार योजना सुरू करुन हित जोपासले गेले. परंतु सदर योजनेत केवळ आदीवासी प्रवर्गात मोडत असलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान अडवून ठेवल्याने आदीवासी लाभार्थ्यांना संध्याकाळची चुल पेटवने अवघड बाब झाली आहे.

 पाच महिन्यांपासून मानधन लापता असल्याने लाभार्थ्यांत रोष निर्माण होऊन मायबाप आम्ही कसे जीवन जगायचे अशी आर्त हाक कानावर पडत आहे. तेव्हा पालकमंत्री महोदयांनी याकडे लक्ष केंद्रित करून आदीवासी निराधार लाभार्थ्यांना अनुदानासाठी योग्यती कारवाई करावी अशी मागणी आदीवासी निराधार लाभार्थ्यांकडुन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments