Ticker

6/recent/ticker-posts

भुरट्या चोरांनी नांदगावातील चार दुकाने फोडली, बेंबाळ पी.एच.सी.चे सुद्धा गेट फोडले ============================ कोंबड्याचं जेवण करून झाले पसार! नांदगावात दिवसभर खमंग चर्चा ============================



भुरट्या चोरांनी नांदगावातील चार दुकाने फोडली, बेंबाळ पी.एच.सी.चे सुद्धा गेट फोडले
============================
कोंबड्याचं जेवण करून झाले पसार! नांदगावात दिवसभर खमंग चर्चा
============================

विजय जाधव(तालुका प्रतिनिधी)
============================
नांदगाव: मुल पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ पोलीस चौकी च्या हद्दीतील व हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदगाव येथील गजबजलेल्या बस स्थानक परिसरातील चार दुकाने भुरट्या चोरांनी फोडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे व्यावसायिका समवेत नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

बंडू बोडूवार, राजू गंपलवार, कवळूजी मोटघरे, भावेश कोटांगले यांच्या दुकानाची तोडफोड करून साहित्य व किरकोळ रक्कम चोरट्यांनी पळवल्याची बोंब सकाळी नांदगावात पसरली होती.

दुसऱ्या एका घटनेत बेंबाळ प्राथमिक स्वास्थ केंद्राच्या जुन्या इमारतीचे द्वार फोडून त्यातील साहित्य चोरून नेले अशी लेखी तक्रार पीएचसी कडून पोलिसात दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार सुद्धा दवाखाना प्रशासनाकडून शुक्रवारी पोलीस चौकी बेंबाळे येथे दाखल करण्यात आली आहे.

नांदगाव येथील चोरीत चोरट्यांनी कोंबड्यावरही मारला ताव
==================
चोरी करणारे अनेक बघितले असतील परंतु असे चोर सापडणे वचितच! चोरी करून झाल्यानंतर एका दुसऱ्या घरून कोंबड्याची चोरी करून त्याच गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वयंपाक करून यथास्त भोजन करून ही मंडळी पसार झाली. या गोष्टीची चर्चा दिवसभर नांदगावात रंगली होती. खरे काय ते चौकशी अंतीच स्पष्ट होईल.

Post a Comment

0 Comments