नांदेड- भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमाद्वारे शासनाच्या निर्देशान्वये मोठ्या दिमाखात विविध स्तरावर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. ९ ऑगस्ट २०२३ बुधवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता रा.प. नांदेड आगारातील कामगार- कर्मचाऱ्यांनी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश (माझी माती माझा देश, मातीला नमन, विरांना वंदन) पंचप्रण ची शपथ सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मा. श्री. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
ही पंचप्रण शपथ एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी सामूहिकरित्या कामगार कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी आगाराचे वाहतूक निरीक्षक मा.श्री. - राजेश धनजकर, मोबीन मैनोद्दीन शेख, पाळी प्रमुख मनोहर माळगे, संभा जोगदंड, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर, सौ. रेखा माचीनवार, माधवराव सुरेवाड, गुलाम रब्बानी, संतोष गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर श्री. नितीन मांजरमकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. याप्रसंगी आगारातील सर्व संघटना प्रतिनिधी, कार्यकर्ते, कामगार कर्मचारी बंधु भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments