Ticker

6/recent/ticker-posts

आईच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जुनगावला संविधानाची प्रत भेट



आईच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जुनगावला संविधानाची प्रत भेट

वेळवा शाळेचे प्राथमिक शिक्षक केतन दहिवले सर यांचा उपक्रम

जुनगाव:(अजित गेडाम)
आई वडिलांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी अनेक महानुभाव वेगवेगळ्या पद्धतीने स्मृती तेवत ठेवतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळवा तालुका पोंभुर्णा येथील प्राथमिक शिक्षक केतन दहिवले सर यांनी आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनगाव येथे प्रत्यक्ष येऊन शाळेला भारतीय संविधानाची प्रत भेट म्हणून दिली.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक खुशाबराव पिंपळशेंडे, डोंगरवार सर, बटे सर, कोसरे सर, गेडाम मॅडम, व इतर शिक्षक उपस्थित होते.

संविधानाचे प्रत्येकाने वाचन करून भारतीय संविधानाने आपल्याला काय दिले हे जाणून घेऊन संविधान रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी असे मत व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments