Ticker

6/recent/ticker-posts

*💥 पोंभूर्णा ते गोंडपिपरी व्हाया मोहाळा रै, चेक खापरी बस सेवा सुरू.!* *➡️ विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा.* @वैभव_पिंपळशेंडे

*💥 पोंभूर्णा ते गोंडपिपरी व्हाया मोहाळा रै, चेक खापरी बस सेवा सुरू.!*


*➡️ विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा.* @वैभव_पिंपळशेंडे
अजित गेडाम, प्रतिनिधी 

पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा, चेक नवेगाव, मोहाळा रै., चेक खापरी, चेकठाणेवासना, भिमणी, घाटकुळ या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गोंडपिपरी येथे जावे लागते. तिथे जाण्याकरिता मोहाळा रै. आणि चेक खापरी मार्गे बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी वेळेत शाळेमध्ये व कॉलेजमध्ये पोहोचू शकत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणत शैक्षणिक नुकसान होत होते.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता परिसरातील पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी केली होती. याची एस. टी. महामंडळ ने तात्काळ दखल घेत आज दिनांक 06/09/2023 पासून बस सेवा सुरू केलेली आहे. सदर बसची पोंभूर्णा वरून सुटण्याची वेळ सकाळी 8 वाजून 10 मिनिटे आहे.

तरी परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या मागणीनुसार बस च्या वेळेमध्ये बदल करण्यात येईल.

*इंजि. वैभव पिंपळशेंडे*
सदस्य, ग्रामपंचायत चेकठाणेवासना तथा युवा कार्यकर्ता भाजपा, पोंभूर्णा
मो. क्र.: 8928989392

Post a Comment

0 Comments