गडचिरोली : गडचिरोली शहरातील फुले वार्डात भाड्याची खोली घेऊन राहणाऱ्या एका महिलेने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची खळबळ जनक घटनाशनिवार 9 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. सुवर्णा ऋषी कोटवार (२५) रा. चक बल्लापूर ता.पोंभुर्णा जि. चंदपूर असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा कोटेवार हिचे माहेर पोंभुर्णा तालुक्यातील बल्लारपूर चक हे असुन तिचे आठ वर्षापूर्वी सिंदेवाही तालुक्यातील पाथरी परिसरातील तरूणाशी लग्न झाले होते. तिला पाच वर्षाचा मुलगा आहे. ती पतीपासून वेगळी राहत होती. मुलगा पतीकडेच राहतो.सुवर्णा गडचिरोली येथे सहा महिन्यांपूर्वी राहायला आली होती. तिने एका दुकानामध्ये काही दिवस काम केले. फुले वार्डातील खोली भाडयाने घेवून ती राहत होती.
दरम्यान तिने आज गळफास घेत जिवनयात्रा संपविली. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली असता घटनास्थळ गाठून पंचनाम केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविला. गळफास घेण्याचे कारण अदयाप गुलदस्त्यात आहे.पुढील तपासा ठाणेदार अरूण फेगडे करीत आहेत.
0 Comments