Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा ते जुनगाव येणाऱ्या बसांचा वेळापत्रक बदलवावा-भाजप, शिवसेनेची मागणी ================== दिवसभरातून तीन बसेस, मात्र प्रवासीच नाही!


पोंभुर्णा ते जुनगाव येणाऱ्या बसांचा वेळापत्रक बदलवावा-भाजप, शिवसेनेची मागणी
==================
दिवसभरातून तीन बसेस, मात्र प्रवासीच नाही!
==================
अजित गेडाम प्रतिनिधी 
जुनगाव:पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव या शेवटच्या टोकावर असणाऱ्या गावासाठी तीन बसेस "सेवा"देत आहेत मात्र त्यांचा ये जा करण्याचा वेळ चुकीचा असल्यामुळे एकतर प्रवाशांना फायद्याचे नाही. दुसरीकडे रिकाम्या बसेस धावत असल्यामुळे एसटी प्रशासनाच्या महसूलावर विनाकारण भार पडत आहे.


महाराष्ट्र शासनाची एसटी गाव खेड्यात पोहोचली असून तिला लाल परी म्हणून आहे ओळखले जाते. गोरगरिबांची व मध्यमवर्गीयांची प्रवासाची उत्तम सोय म्हणून लाल परी कडे बघितले जाते. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे व नियोजनामुळे एसटी वेळापत्रक योग्य नसल्याने प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्या बसेसचा काहीही उपयोग होत नाही आहे.

सकाळी साडेनऊ वाजता पहिली बस विद्यार्थ्यांसाठी येते. तिच्या पाठोपाठ दहा मिनिटाच्या अंतराने दुसरीही बस येते. तिच्या पाठोपाठ साडेअकरा वाजता तिसरी बस येते. त्यानंतर सायंकाळचे पाच वाजेपर्यंत बसेस नसल्याने दिवसभर सकाळच्या बसेसने गेलेल्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना सायंकाळपर्यंत ताटकळत बाहेरगावातच थांबावे लागते. साडेनऊच्या बस नंतर दुसरी बस ही साडेअकरा वाजेपर्यंत, आणि तिसरी बस दुपारी दीड ते दोन किंवा तीन वाजता असा वेळ ठेवावा जेणेकरून प्रवाशांना सोयीचे होईल आणि एसटी महामंडळाचा सुद्धा फायदा होईल.


या सर्व समस्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने रीतसर वेळापत्रक सादर करून त्या वेळेवर बसेस सोडाव्यात अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा जूनगाव चे उपसरपंच राहुल भाऊ पाल, व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा माजी सरपंच जीवनदास गेडाम यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments