Ticker

6/recent/ticker-posts

जुनगाव येथे रावण दहन! आदिवासी समाजाचा विरोध?

अजित गेडाम, प्रतिनिधी जुनगाव
चंद्रपूर जिल्ह्यातील जुनगाव येथे दसऱ्यानिमित्त आदिवासींचे दैवत असणाऱ्या रावणाचे दहन केल्यामुळे आदिवासी समाजात संताप पसरला आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत ही प्रथा गावात नव्हती. सोने लुटण्याचे कार्य दरवर्षी होतेे. मात्र रावणाचा पुतळा करून जाळणे हा प्रथमच प्रकार बघायला मिळाला. त्यामुळे आदिवासी समाजातील युवकांनी या घटनेचा विरोध करून निषेध नोंदविला.
शेवटी पुतळा करून जाळणाऱ्यांनी आपली चूक कबूल केली. आणि आदिवासी समाजाची माफी मागितली त्यामुळे या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडला असला तरी सुद्धा अशा घटना घडू नये घडू नये यासाठी शासनाने व पोलीस प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडणार नाहीत.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी प्रत्येक गावात पोलिसांचा प्रतिनिधी म्हणून पोलीस पाटील हा प्रत्येक गावात कार्यरत असतो.

Post a Comment

0 Comments