Ticker

6/recent/ticker-posts

आपतग्रस्त शेतकऱ्याला काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी भाऊ मरपल्लीवार यांचे कडून सांत्वन व आर्थिक मदत


आपतग्रस्त शेतकऱ्याला काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी भाऊ मरपल्लीवार यांचे कडून सांत्वन व आर्थिक मदत

 जुनगाव: (अजित गेडाम) प्रतिनिधी
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुद्रुक येथील शेतकऱ्याची आग लागल्याने त्यांचे घर जळून मोठी नुकसान झाली. दिनांक 21/10/2023 रोज शनिवारला मौजा देवाडा बुज येथील अत्यंत गरीब कुटूंबातील शेतकरी श्री. ठुमदेव जैराम घोटेकार यांचे घर पूर्णपणे जळुन खाक झाले होते. ही बाब काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी भाऊ मर्पलीवार यांनी त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत नगदी स्वरूपात दिली.

मान. रविभाऊ मरपल्लीवार अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभूर्णा यांना गावातील कांग्रेस पदाधिकारी मार्फत कळविण्यात आले असता ते काही कामानिमीत्य बाहेर ठिकाणी गेले असल्याने आज दिनांक 29/10/2023 रोज रविवारला सकाळी संबंधित कुटूबांला आर्थिक मदत देऊन त्यांचे सांत्वन केले. व पुन्हा काही भरीव मदतीचं आश्वासन दिले.. 

याप्रसंगी गावातील कांग्रेस पदाधिकारी मान. दादाजी पा. व्याहाडकर घोसरी , मान. अतुल चुदरी तं.मु.स.अध्यक्ष , सौ. भारती श्यामसुंदर बदन संचालिका कृ.उ.बा.स. पोंभूर्णा , मान. अशोक मांडवगडे सदस्य ग्रा.पं. देवाडा बुज, मान. श्यामसुंदर बदन माजी तं.मु.स. अध्यक्ष , हेमंत बंडूजी आरेकर उपसरपंच ग्राम.पं. , विकासजी शेडमाके पत्रकार , मुक्तेश्वरजी झाडे सामाजिक कार्यकर्ते, महेशजी घोडे युवा कार्यकर्ता उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments