Ticker

6/recent/ticker-posts

आज साजरा होत आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा




आज साजरा होत आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन

दरारा ट्वेंटी फोर न्यूज

चंद्रपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक बौद्ध धर्मीय सण आहे. बौद्ध धर्म यांद्वारे हा सण उत्सव म्हणून दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी नागपूर येथे साजरा केला जातो.


महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी या दिवशी नागपूरला लाखोच्या संख्येने उपस्थिती दर्ज करतात. या उत्सवाची पार्श्वभूमी म्हणजे हा एक धर्मांतरण सोहळा आहे. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून देशभर साजरा केला जातो.


इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. सम्राट अशोक राजाने केलेली ही एक मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतरण करण्याचे ठरविले आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मध्ये आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. त्यामुळेच नागपूरच्या दीक्षाभूमीला दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाते.
या सोहळ्याला देश-विदेशातील बौद्ध भिक्खू उपासकाने अन्य राजकीय व्यक्ती सुद्धा सहभागी होतात.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची केंद्र निर्माण झालेली आहेत.


धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व देश बांधवांना दरारा 24 तास या न्यूज नेटवर्क कडून कोटी कोटी शुभेच्छा!




















Post a Comment

0 Comments