Ticker

6/recent/ticker-posts

मेडपल्ली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा मनमानी कारभार! आदेश असूनही कोरोणा काळातील प्रोत्साहनपर भत्ता देण्यास करतोय टाळाटाळ!! 💥माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे न्याय मिळवून देण्यासाठी अंगणवाडी ताईंनी दिले निवेदन!!

💥मेडपल्ली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा मनमानी कारभार! आदेश असूनही कोरोणा काळातील प्रोत्साहनपर भत्ता देण्यास करतोय टाळाटाळ!!


💥माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे न्याय मिळवून देण्यासाठी अंगणवाडी ताईंनी दिले निवेदन!!

अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली गावातील सर्व अंगणवाड्या, मदतनीस Covid 19 मध्ये मार्च २०११ ते २०१९ आणि मार्च २०२० से डिसेंबर २०२० मध्ये जिवाची पर्वा न करता गरोदर माता स्तनमाता आणि मुले यांना आहार बनवून दिलेला आहे.प्रत्येकाच्या घरी भेटी दिल्या आहेत याच्यापूर्वी ग्रा.प.मेडपल्ली यांचे कडून प्रती सेविका मदतनीस १०००/- प्राप्त झाले आहेत.तरी परंतु तसे पत्र CEO गडचिरोली यांचे पत्र जान / जिपरा/ साप्रावि / पंचा/ स्था- ३ / ११२३/२०२१ दि.३०/६/२०२१ असतांना सुद्धा ग्रामसेवक मडावी यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे.

याकरिता सरपंच यांना दि. १०/४/२०२३ रोजी ग्रा.पं.मेडपल्ली येथे अर्ज दिलेले आहे.सरपंच आमच्या अर्जाची दाखल घेऊन ग्रामसेवक यांना कोरोणा काळातील प्रोत्साहनपर भत्ता देण्यास सांगितले परंतु ग्रामसेवक यांनी हेतुपुरस्पर थांबविले असून जाणूनबुजून मडावी यांनी ताळाटाळ करीत आहे.

ग्रामसेवक याना फोन केला तर उदट उत्तर देतात मला एकच काम आहेत का ? एकच ग्रा.पं.आहे का ? ग्रा.पं. कार्यालयात"या"म्हणतात आणि ते स्वतःच गैरहजर राहतात मानसन्मानाने बोलत नाही तोंडाला ला जस येते तस बोलतात ग्रामसेवक अश्याप्रकारे वागणूक देत असेल तर आम्ही कुणाकडे हात पसरायचे.

ग्रामपंचायत मेडपल्ली येथील कर्मचारी चांगली वागणूक देत असतात परंतु यानी मडावी यांनी स्वताला मोठे अधिकारी समजतात त्याकरिता नौकरी करतांना वेगवेगळ्या गोष्टीला सामोरे जावे लागते.कोविड 19 प्रमाणपत्राची मागणी केले तर मडावी"हे"मी त्या कालावधीमध्ये ग्रा.पं.मेडपल्ली येथे कार्यरत नसल्यामुळे सदर प्रमाणपत्र मी देऊ शकत नाही असे प्रमाणपत्र दिले परंतु आशा सेविका यांना तोच ग्रामसेवक कोविड - 19 ची मानधनाची रक्कम अदा करेल असे बोलतो.

मडावी ग्रामसेवक हे हेतुपुरस्सर आशा वर्कर, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना त्रास देत आहे स्पष्ट होते.त्याकरिता आमची एक अडचण लक्षात घेऊन समजून दूर करावे या आशेने मेडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कासमपल्ली, बेडमपल्ली,गुर्जा (बु),तुमरकसा,मेडपल्ली,तलवाड,कोरेली (बु),कोरेली (खु) येथील आशावर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे निवेदन देऊन न्याय मिळवून देण्यासाठी मागणी केली आहे

Post a Comment

0 Comments