Ticker

6/recent/ticker-posts

आमदार किशोर जोरगेवार यांचे वर पत्रकारांची दिवाळीनिमित्त नाराजी


आमदार किशोर जोरगेवार यांचे वर पत्रकारांची दिवाळीनिमित्त नाराजी

दरारा 24 तास 
चंद्रपूर: प्रतिनिधी 
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय किशोर भाऊ जोरगेवार यांनी दिवाळीनिमित्त पत्रकारांना हिनावल अशी भावना पत्रकारांमधून व्यक्त होताना त्यांच्याच कार्यालयाबाहेर दिसून येत होती.
एका बाजूने प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी पत्रकारांचा राजकारणी, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांना दिवाळीनिमित्त काही मिठाई देतात. कारण जागरूक असलेल्या समाज कार्यकर्त्याला व नेत्याला माहित आहे की तळागाळात राहून जनतेच्या समस्या शासन दरबारात पर्यंत पोहोचवण्याचा काम हा शहरी असो की ग्रामीण पत्रकारच करत असतो. पत्रकारांच्या माध्यमातून आपण राजकारण समाजकारण समाज सेवा हे सर्व करत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम सुद्धा हे पत्रकार करत असतात म्हणून त्यांची सुद्धा दिवाळी गोड व्हावी म्हणून काही मंडळी पत्रकारांना समजून घेतात. तर काही मंडळी समजून न समजल्याच भाव आणून घेतात.
चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातही असा एकच नेता पत्रकारांनी बघितला आहे तो म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या रूपाने. पत्रकारांच्या भावना त्यांची समस्या सर्व जाणून घेण्याची तसदी एकमेव या नेत्यांनी घेतली आहे. वर्षांवर्षापासून दिवाळीनिमित्त पत्रकारांना जाहिरात स्वरूपात काही जाहिराती मिळतात आणि उपहार सुद्धा.

परंतु चंद्रपूरच्या लोकप्रिय आमदारांना या बाबी समजू नये याचे आश्चर्य व्यक्त केल्या जाताना त्यांच्याच निवासस्थानाच्या सभोवताल उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या मुखातून ऐकायला मिळत होत्या.


Post a Comment

0 Comments