पोंभूर्ण्यात अजूनही सुरूच आहे सुगंधीत तंबाखूचा गोरखधंदा
-संबंधीत विभागाचे कमालीचे दुर्लक्ष;
पोंभूर्णा :-महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूवर बंदी घातली असली तरी पोंभूर्णा शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या सुगंधीत तंबाखूची तस्करी होत आहे.पोंभूर्णा शहरातील सुगंधित तंबाखू तस्करी करणारा मोठा तस्कर पोंभूर्णा,गोंडपिपरी,मुल एवढेच नव्हे तर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी,धानोरा,गडचिरोली तालुक्यातही अवैध सुगंधीत तंबाखूची तस्करी बिनधास्तपणे करीत आहे.यासाठी घाटकुळ व हरणघाट मार्गाचा वापर केल्या जात आहे.अवैध व्यवसायकाचे एवढे प्राबल्य वाढले आहे की तो प्रशासनालाही जुमानत नाही.पोंभूर्णा शहरातून सुरू असलेला अवैध गोरखधंदा स्थानिक पोलीस प्रशासन व अन्न औषध प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
पोंभूर्णा शहरात अवैध सुगंधीत तंबाखूच्या तस्करीचा मोठा रॅकेट सक्रिय आहे.यात शहरातील एक मोठा तस्कर अवैध सुगंधीत तंबाखूची विक्री पोंभूर्णा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातही बिनधास्तपणे करीत आहे.पोंभूर्ण्यातील तस्कराकडून रोज मध्यरात्रीनंतर अवैध सुगंधीत तंबाखूची वाहतूक केली जाते.यासाठी कार,मारोती व्हॅन,पिक अप चा वापर केला जातो.चोरटी वाहतूकीसाठी घाटकुळ व हरणघाट मार्गाचा वापर करण्यात येत आहे. हा गोरखधंदा पोंभूर्ण्यात मागील पाच वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे.आता तर संबंधित तस्कराने मुल तालुक्यातील एका गावातही त्याने आपला गोडाऊन थाटला आहे.स्थानिक पोलीस प्रशासनाला सदर प्रकार माहिती नसणे व त्यांचेवर कोणतीच कारवाई न होणे यावर कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.याबाबतचे वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र संबंधित विभागाने तस्कराचे मुसक्या आवळलेले नाही.यामुळेच या अवैध व्यवसायकांचे एवढे प्राबल्य वाढले आहे.म्हणून प्रशासनालाही न जुमानत असल्याचे चित्र आहे.संबंधित विभागाने योग्य पावले उचलून तंबाखू तस्करीवर आळा घालण्याची मागणी जनसामान्यांकडून करण्यात येत आहे.
---------
पोंभूर्ण्यातील तस्कर करोडोच्या सुगंधित तंबाखूची विक्री करीत असतो.आज घडीला तो मोठा डिलर बनला आहे. सुगंधित तंबाखूची मिलावट सुद्धा घरामध्येच केली जात असल्याची माहिती आहे.याशिवाय तस्कराने दुसरा पर्याय म्हणून मुल तालुक्यातील एका गावातही त्यांने गोडावून बनवलेला असल्याने तिथूनही अवैध तंबाखूची विक्री केली जाते.मिलावट केलेला सुगंधित तंबाखू पहाटेच्या सुमारास पोंभूर्णा वरुन गडचिरोली जिल्ह्यात पाठवला जातो.संबंधिताने या गोरखधंद्यातून कोट्यावधींची माया जमवली आहे.
--------
संबंधित तंबाखू तस्कर सर्वांना मॅनेज करत असल्याचा आव आणत माझे कुणीच काही करत नाही अशी बतावणी करीत आहे.यामुळे तंबाखू तस्करासमोर प्रशासनाने नांगी टाकली असावी यावर शंका उत्पन्न होतांना दिसत आहे.
0 Comments