पोंभुर्णा: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच मेटकुटीला आलेला शेतकरी वारंवार होणाऱ्या पीक नुकसानीमुळे हवालदिल झालेला असून जीवन जगण्याची व शेती वाचवण्याची धडपड करत आहे.
नोव्हेंबर ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतातील धान, कापूस, सोयाबीन, व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ताबडतोब सर्वे करून आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी जूनगावचे उपसरपंच भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष श्री राहुल भाऊ पाल यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.
ही अवस्था एकट्या जून गावची नाही तर तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ताबडतोब करावी अशी मागणी राहुल भाऊ पाल यांनी केली आहे.
0 Comments