Ticker

6/recent/ticker-posts

तहसीलदार शिवाजीराव कदम यांची धडक कारवाई:रेती वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर दंडात्मक कारवाई



तहसीलदार शिवाजीराव कदम यांची धडक कारवाई:रेती वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर दंडात्मक कारवाई 


*▪️पोंभूर्णा महसूल विभागाची तिन ट्रॅक्टर वर दंडात्मक कारवाई*

*पोंभूर्णा/१३ जानेवारी.*
(अजित गेडाम,)
तालुक्यातील गंगापूर - टोक परिसरात रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन करून रेती व मुरूम वाहतूक करण्याच्या तयारीत असलेल्या तिन ट्रॅक्टर रात्रीच्या सुमारे साडेअकरा वाजताच्या दरम्यान घटनास्थळी पकडून रात्रीच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जमा करून कारवाई करण्यात आली. ही कार्यवाही नवेगांव मोरे येथील मंडळ अधिकारी वि.म.मत्ते यांनी जप्तीनामा करत पार पाडली. यावेळी घटनास्थळावर मंडळ अधिकारी मत्ते सोबत स्वतः तहसीलदार शिवाजी कदम उपस्थित होते.

पोंभूर्णा तहसीलदार शिवाजी कदम व नवेगांव मोरे येथील मंडळ अधिकारी वि. म. मत्ते गुरूवारच्या रात्री ११.३५ वाजताच्या दरम्यान अवैद्य खनिज वाहतूक तपासणी करीत असतांना मौजा टोक येथील वैनगंगा नदीपात्राजवळ नवेगांव मोरे येथील अंशुल नंदकिशोर मोरे यांची ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३४ बिआर ७४१३ ट्राली क्रमांक निरंक, झगडकर रिठ येथील संजय ठकसेन झगडकर यांची ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३४ बिआर ८६४१,ट्राली क्रमांक निरंक, आणि पिपरी देशपांडे येथील शेखर रघुनाथ व्याहाडकर यांची ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३४ सिडी २७४९,ट्रॉली क्रमांक निरंक अशा तिन ट्रॅक्टरवर अवैध खनिज वाहतूक करतांना कारवाई करण्यात आली. यातील अंशुल नंदकिशोर मोरे यांच्या ट्रॅक्टर ट्राॅली मध्ये एक ब्राॅस मुरूम, संजय ठकसेन झगडकर यांच्या ट्रॅक्टर ट्राॅली मध्ये एक ब्राॅस रेती, आणि शेखर रघुनाथ व्याहाडकर यांच्या ट्रॅक्टर ट्राॅली मध्ये एक ब्राॅस मुरूम असे गौणखनिज आढळून आले.

या जप्त करण्यात आलेल्या तिनही ट्रॅक्टरजवळ वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७)व(८) नुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून आपणावर महसूल चोरी व वाहतूक प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल का करण्यात येऊ नये, अशी नोटीस द्वारे विचारणा करण्यात आली आहे.याशिवाय हे प्रकरण उप विभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असून त्या कार्यालयाची दंडात्मक कारवाई वेगळीच राहणार असल्याचे पोंभूर्णा महसूल विभागाने सांगीतले.🔅
===========================

Post a Comment

0 Comments