विजय जाधव यांना मातृशोक -मुक्ताबाई शंकरराव जाधव यांचे निधन
अजित गेडाम,
जुनगाव: मुल तालुक्यातील नांदगाव येथील माजी उपसरपंच तथा पत्रकार विजय जाधव यांच्या मातोश्री श्रीमती मुक्ताबाई शंकरराव जाधव यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहते घरी दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी रात्री 9 वाजता दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 74 वर्षे होते.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता निघणार आहे. नांदगाव येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी अंत्ययात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन माजी उपसरपंच तथा पत्रकार विजय जाधव यांनी केले आहे.
दरारा 24 तास आणि वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
0 Comments