Ticker

6/recent/ticker-posts

अवैध बांधकाम करणाऱ्यास अभय कोणाचे? ग्रामपंचायत नतमस्तक का? नागरिकांचा सवाल! प्रशासनाच्या वतीने गंभीर दखल घेण्याची गरज! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मागणी


अवैध बांधकाम करणाऱ्यास अभय कोणाचे? ग्रामपंचायत नतमस्तक का? नागरिकांचा सवाल!

प्रशासनाच्या वतीने गंभीर दखल घेण्याची गरज! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी
मुल तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अति संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असणाऱ्या नांदगाव ग्रामपंचायतीत सध्या अनागोंदी कारभार सुरू असल्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत.


ग्रामपंचायत अधिनियमाच्या नियमांची पायमल्ली होत असताना सतत पहावयास मिळत आहे. ग्रामपंचायत अधिनियमानुसार मालमत्ता धारकास ग्रामपंचायतीला जागा मालकीची कागदपत्रे, मंजूर लेआउट किंवा बांधकाम नकाशा, (मान्यता प्राप्त पदवीधारक अभियंता किंवा वस्तू रचना कारणे तयार केलेला) सादर करावा लागतो. राष्ट्रीयकृत बँकेत या बांधकामासाठीचे विकास शुल्क, कामगार उपकर भरलेले चलन आणि विहित नमुन्यातील वास्तू रचनाकार आणि स्थापत्य अभियंत्यांचे पत्र सादर करावे लागतात. या प्रक्रियेनंतर ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक योग्य ती प्रशासकीय पूर्तता करून बांधकाम परवाना देऊ शकतात. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून या ग्रामपंचायतीत अनागोंदीपणे कारभार सुरू आहे. असा आरोप खुद्द ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सागर भाऊ देऊरकर यांनी केला आहे.ग्रामपंचायत ची जागा बळकावून स्वतःच्या जागे ला लागून असल्याचा फायदा घेऊन अनाधिकृत बांधकाम करत असणाऱ्या राजु गमपलवार या व्यक्तीस ग्रामपंचायत ने कुठलीच परवानगी दिली नसताना बांधकाम सुरू आहे. स्वतःच्या जागेला लागून असलेल्या गावठाण जागेवर अतिक्रमण करून व्यावसायिक चाळ निर्माण करण्यात येत आहे.


खुद्द उपसरपंच यांनी तक्रार दाखल करून बांधकाम थांबवण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप प्रशासनाने सुद्धा कुठलीच कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अवैध बांधकाम करणाऱ्या व्यक्तीची हिंमत वाढली असून पुढील बांधकाम जोरात सुरू केले असून ते आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई करून सदर बांधकाम थांबवावे अशी मागणी खूद उपसरपंच सागर देवकर यांनी केली आहे.
सदर बाब वरिष्ठ पातळीवर पोहोचली असून मुख्य कार्यपालन अधिकारी व तत्सम वरिष्ठ अधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करून सदर ग्रामपंचायत ची चौकशी करावी व दोषी असणाऱ्यास शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
असे प्रकार थांबविले गेले नाही तर गावातील अनेक नागरिकही कुठेही अतिक्रमण करून आपली दुकाने थाटतील अशी शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सदर बांधकाम झुणका भाकर केंद्राच्या लागून असल्यामुळे झुणका भाकर केंद्र व सार्वजनिक स्वच्छतागृह सुद्धा बळकवण्याच्या तयारीत असल्याचे दिसते ,अशी शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रतीकात्मक छायाचित्र

Post a Comment

0 Comments