जूनगावच्या सरपंच पूनम चुधरी यांचे वरील अविश्वास ठराव पारित
पोंभुर्णा : तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायत सरपंच सौ पूनम राहुल चुधरी यांच्या विरोधातील अविश्वास ठराव सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत सहा विरुद्ध शून्य मताने मंजूर झाला.
जुनगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचावरील अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सात पैकी सहा ग्रामपंचायत सदस्य सभागृहात उपस्थित होते. तर सरपंच पूनम चुधरी या अनुपस्थित राहिल्या.
यावेळी देण्यात आलेल्या नोटिसांमधील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या दरम्यान ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, गावात केलेल्या कामांचे बिल अदा करण्यास टाळाटाळ करणे, अशा विविध कारणावरून ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच पूनम सुदरी यांचे वर अविश्वास ठराव दाखल केला होता. या सभेत सरपंचाच्या विरोधात उपस्थित सर्व सहा सदस्यांनी मतदान केले. त्यात विश्वेश्वरराव नानाजी भाकरे, राहुल काशिनाथ पाल, तेजपाल आनंदराव रंगारी, सौ पल्लवी किशोर देशमुख, सौ सुनीताई चंद्रकांत चुधरी, सौ माधुरी प्रकाश झभाडे या सदस्यांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले.सरपंच अनुपस्थित होत्या. त्यामुळे 6 विरुद्ध 0 मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सभेचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार शिवाजीराव कदम, ग्रामसेवक चांदेकर, इत्यादी उपस्थित होते.
भावी सरपंच सुद्धा भारतीय जनता पक्षाचीच राहील अशी प्रतिक्रिया निवडणुकीनंतर विद्यमान उपसरपंच राहुल भाऊ यांनी दिली आहे.
0 Comments