विनोद अहिरकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत नवचैतन्य
चंद्रपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पक्षाला उभारी देण्याच्या उद्देशाने युवा दमाच्या नव्या चेहऱ्यांना वरिष्ठ पदांवर नियुक्त्या केल्या आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांची प्रदेश उपाध्यक्ष (ओबीसी विभाग) पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
0 Comments