भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
गोंडपिपरी कोठारी मार्गावर आक्सापूर जवळ घडली घटना
दरारा 24 तास
गोंडपिपरी: दोन दुचाकी गोंडपिपरी वरून चंद्रपूर मार्गे जात असताना विरुद्ध दिशेने चंद्रपूर वरून सुरजागडला लोह खनिज आणण्याकरिता जाणाऱ्या हायवाची दुचाकींना एवढी जबर धडक दिली की जाग्याव्यावरच दुचाकी चालक तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दि (४) रविवारी दुपारी बारा वाजता दरम्यान घडली. -
सुरजागड लोहखनिज प्रकल्प सर्वसामान्यांच्या जीवावर उठलेला दिसत आहे अनेक अपघात होत आहे. हायवा
बाहनाच्या धडकेत अनेकांना कुठलीही ठोस उपाययोजना यापूर्वी जीव गमवावा लागला. वाहन चालकांवर प्रशासनाचा धाक दिसत नाही. अनेक राजकीय पक्षाकडून सूरजागड बाहतुकीचा विरोधात आंदोलने झाली परंतु प्रशासनाने
केली नाही. परिणामी अपघाताच्या घटनेत बाढ झाल्याचे दिसत आहे. चंद्रपूर कोठारी मार्गावरील आक्सापूर येथील मंदिरासमोर सुरजागडच्या हायवाची दोन दुचाकींना रविवारी दुपारच्या दरम्यान हायवाने धडक दिली व भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. घटनास्थळी कोठारी व गोंडपिपरी पोलीस दाखल झाले. दुचाकीस्वार तिघांचा मृत्यू घटनास्थळी झाला . त्यातील एका मृतकाची ओळख पटली असून गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथील सरकार नामक युवक असल्याची माहिती मिळाली. इतर दोन मृतकांचे नाव बातमी लिहेपर्यंत कळू शकले नाही. पुढील तपास कोठारी व गोंडपिंपरी पोलीस करीत आहे. हायवा चालकानी घटनास्थळावरून पसार केला असून चालकाचा शोध सुरू आहे. मृतकांचे शवविच्छेदन करण्यासाठी बल्लारशा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
0 Comments