अरुण रामुजी भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड --- दपुम रेल्वे बिलासपुर झोन चे महाप्रबंधक आलोककुमार यांनी नागभीड जंक्शन स्टेशनवर आज भेट दिली . त्यांच्यासमवेत दपुम रेल्वेचे नागपुर मंडल प्रबंधक नमिता त्रिपाठी मॅडम उपस्थित होत्या.
यावेळी दपुम रेल्वे बिलासपुर झोनचे झेडआरयुसीसी सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी त्यांचे स्वागत करीत निवेदन दिले व विविध समस्यांवर चर्चा केली . निवेदनात खालील मागण्याची पूर्तता करावी यासाठी मागण्याचे निवेदन देण्यात आले.बल्लारशा नागभीड गोंदिया गाडी तसेच जलद गाड्या वेळेवर चालत नाही.लोकल गाडयांना कोणत्याही स्टेशनवर थांबवावे लागते.त्यामुळे कोणतीच ट्रेन निर्धारित वेळेवर पोहचत नाही.तसेच गोंदिया नागभीड चांदाफोर्ट ही गाडी 9/8/23पासून, वडसा नागभीड चांदाफोर्ट मेमू प्यासेंजर गाडी दिनांक 10/8/2023 पासून, चांदाफोर्ट नागभीड गोंदिया मेमू प्यासेंजर ही गाडी दिनांक 10/8/2023 पासून अनिश्चित वेळेसाठी बंद करण्यात आल्या. जिल्याच्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी सोईस्कर आहेत.या गाड्या पूर्ववत सुरु करण्यात याव्यात. जबलपूर चांदा फोर्टएक्सप्रेस ही गाडी फक्त नागभीडला थांबते. या गाडीला मूल, सिंदेवाही,ब्रम्हपुरी, अर्जुनी, सौदंड या ठिकाणी थांबा द्यावा. अनेक ठिकाणी थांबा नसल्याने ही गाडी रिकामी जाते. यामुळे सरकारचा महसूल बुडतो.नागभीड रेल्वे जंक्शनलाअमृत रेल्वे स्टेशन या योजनेत समावेश करावा. या प्रसंगी नागभीड स्टेशन रेल्वे सल्लागार समिती सदस्य व माजी न.प. सभापती सचिन आकुलवार , ज्येष्ठ नागरिक प्रा. हरिष मेहेर , विनायक चिलबुले , पंकज फटींग , प्रशांत भुरे ई. कार्यकर्ते उपस्थित होते .
विशेष करुन चंद्रपुर जाणारी सकाळची गाडी पुर्ववत सुरु करावी यासाठी जोरदार मागणी उपस्थित सर्वांनीच केली .
0 Comments