Ticker

6/recent/ticker-posts

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी काँग्रेसची जनजागृती मोहीम-प्रशांत दानव व विनोद अहिरकर यांचे नेतृत्वCongress awareness campaign for justice rights of OBCs-led by Prashant Danav and Vinod Ahirkar



ओबीसींच्या न्याय हक्कासाठी काँग्रेसची जनजागृती मोहीम-प्रशांत दानव व विनोद अहिरकर यांचे नेतृत्व

Congress awareness campaign for justice rights of OBCs-led by Prashant Danav and Vinod Ahirkar

चंद्रपूर: या मातीचा खरा योद्धा ओबीसी आहे. परंतु केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने या देशातील ओबीसी वर्गाची उपेक्षा होत आहे. नोकरी व आरक्षणामध्ये ओबीसी वर्गावर अन्यायकारक धोरण केंद्र व राज्य सरकार द्वारा अवलंबिले आहे.

महाराष्ट्रात कष्टकरी, मजूर,शेतकरी वर्गाची पिळवणूक होत आहे. त्या विरोधात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद भाऊ अहिरकर यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात ओबीसी जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील खालील गावांमध्ये ही मोहीम पोहोचणार असून ओबीसी बांधवांना केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

घोसरी व जाम खुर्द येथे सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत दिनांक 8 2 2024

देवाळा खुर्द/ डोंगर हळदी
दिनांक नऊ फेब्रुवारी 2024 वेळ सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत

आंबे धानोरा / उमरी
दिनांक 10 फेब्रुवारी 2024
वेळ सायंकाळी सहा ते आठ

बोर्ड बोरकर/ चिंतल धाबा
दिनांक 11 फेब्रुवारी 2024
वेळ सायंकाळी सहा ते आठ

आष्टा / वेळवा
दिनांक 12 फेब्रुवारी 2024
वेळ सायंकाळी सहा ते आठ

नवेगाव मोरे / मोहाळा
दिनांक 13 फेब्रुवारी 2024
वेळ सायंकाळी सहा ते आठ

घाटकुळ/ भीमनी
दिनांक 14 फेब्रुवारी 2024
वेळ सायंकाळी सहा ते आठ

पिपरी देशपांडे /दिघोरी
दिनांक 15 फेब्रुवारी 2024
वेळ सायंकाळी सहा ते आठ

फुटाणा/ चक फुटाणा
दिनांक 16 फेब्रुवारी 2024
वेळ सायंकाळी सहा ते आठ

जूनगाव/ देवाडा बुज.
दिनांक 17 फेब्रुवारी 2024
वेळ सायंकाळी सहा ते आठ

वरील प्रमाणे प्रत्येक गावात ही मोहीम पोहोचणार असून ओबीसी बांधवांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन श्री प्रशांत दानव जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, श्री विनोद भाऊ अहिरकर उपाध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, श्री रवींद्र मरपल्लीवार अध्यक्षता तालुका काँग्रेस कमिटी पोंभुर्णा, हेमंत आरेकर अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस कमिटी पोंभुर्णा, देवरावजी करते अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी अनुसारचित जाती विभाग, श्री अमित डी.पाल अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग,हर्षानंद दुर्गे, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, प्रशांत झाडे सोशल मीडिया प्रमुख बल्लारपूर विधानसभा क्षेत्र यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments