चिचडोह बैरेजचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात यावे-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कडे काँग्रेस नेते कवळूजी कुंदावार यांची मागणी
पोंभुर्णा: उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वैनगंगा नदीच्या भूगर्भातील पाणी पातळीत घसरण झाल्याने वैनगंगा नदी कोरडी पडली आहे कोरडी पडली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे तसेच उन्हाळी धान व इतर पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
वैनगंगा नदीच्या पाणीच्या भरोशावर जुनगाव,देवाडा बुज., पिपरी देशपांडे, घाटकोळ, चेक ठाणा, गंगापूर ,टोक इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी शेती पंप घेतले आहेत परंतु नदीलाच पाणी नसल्याने या मोटारींचा व पंपांचा काहीही उपयोग होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव व पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रथम सभापती कवळूजी कुंदावार यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेऊन व पिण्याच्या पाण्याची गंभीरता लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांतर्फे एक निवेदन देऊन चीच डोह्यारेजचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्याची मागणी केली आहे.
निवेदन देताना शेतकरी व जुनी गावची माजी उपसरपंच साईनाथ गोहणे, माजी सरपंच जीवनदास गेडाम व शेतकरी उपस्थित होते.
0 Comments