Ticker

6/recent/ticker-posts

यंदा प्रतिभा धानोरकरच खासदार होणार! चंद्रपूर आर्णी करांची भाजपवर नाराजी


यंदा प्रतिभा धानोरकरच खासदार होणार! चंद्रपूर आर्णी करांची भाजपवर नाराजी

चंद्रपूर: चंद्रपूर आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने माजी खासदार व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा पत्ता कट करून राज्याचे हेवी वेट मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री यांना उमेदवारी बहाल केली आहे. तर काँग्रेस पक्षाने दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना मैदानात उतरवले आहे.

  मात्र 2019 च्या निवडणुकीपेक्षा यावर्षी राजकीय वातावरण वेगळ्या वळणावर आहे. इंडिया आघाडीच्या वतीने प्रतिभा धानोरकर यांना भरघोस पाठिंबा जाहीर करत 27 मार्च रोजी भव्य शक्ती प्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनात सर्व सहाही विधानसभा क्षेत्रातील आघाडीतील सर्व घटक पक्ष व त्यांचे कार्यकर्ते नेते हीरहिरीने उपस्थित होते. हे शक्ती प्रदर्शन काँग्रेसच्या उमेदवारासाठी अधिकच बळकटी देणारे ठरले. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे.

      अनेक विधानसभा क्षेत्रातून आढावा घेतला असता बहुसंख्य मतदारांनी ईव्हीएम मशीनने दगाबाजी केली नाही तर भरघोष मताच्या अंतराने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर विजयी होतील असा सूर नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.

     भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाला सर्वत्र जनता कंटाळलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकट्या सुधीर मुनगंटीवार यांचा करिष्मा चालणार नाही. कारण भाजप हा पक्ष जातीयवादी,बहुजन विरोधी,संविधान विरोधी,शिक्षणविरोधी असल्याचे सामान्य मतदार बोलून दाखवत आहेत.
===================
काँग्रेस मधील गटबाजी संपुष्टात, प्रतिभाताईंसाठी सर्वजण एकजूट-एकट्या दुकट्याने फरक पडणार नाही! सामान्य मतदारांच्या भावना
===================
     जिल्ह्यात काँग्रेस  पक्षात गटबाजी थोडीफार आहे. परंतु या लोकसभा निवडणुकीत ही गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र 27 तारखेच्या शक्ती प्रदर्शन व निर्धार सभेच्या वेळेत सिद्ध झाले. विजय वडेट्टीवार गटाचे प्रमुख कार्यकर्ते धानोरकर ताईंच्या पाठिंबासाठी सर्व मतभेद विसरून एकाच मंचावर, एकाच मैदानात उपस्थित होते. मुल तालुक्यातील संतोष रावत गटाचे म्हणून ओळख असलेले अनेक पुढारी व कार्यकर्ते या निर्धार सभेत आवर्जून उपस्थित दिसले. त्यामुळे संतोष रावत एकटे- दुकटे पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. संतोष रावत यांची भूमिका काहीही असो लोकसभा निवडणुकीवर त्यांच्या भूमिकेचा काहीही फरक पडणार नाही असे अनेकांनी बोलून दाखवले आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे भारत दस्त नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचे शी याबाबत जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसमधील गटबाजी तूर्तास संपुष्टात आली असून धानोरकरांच्या विजयासाठी सर्वांनी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
एकंदरीत सहापैकी सहाही विधानसभा क्षेत्राचा सध्याचा राजकीय आढावा घेतला असता काँग्रेसच्या उमेदवारासाठी वातावरण अनुकूल असल्याचे चित्र दिसत असून भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना पराजयाचा सामना करावा लागणार असेही बोलल्या जात आहे. येणारा काळच सांगेल कोण होणार विजयी.

Post a Comment

0 Comments