*आईच्या तेरवीला बगल देऊन शालेय विद्यार्थ्यांना भोजनदान*
*कोट गांव येथे अनोखा उपक्रम*
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी नागभीड ---नागभीड तालुक्यातील कोटगांव येथे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी आईची तेरवी न करता शालेय विद्यार्थ्यांना भोजनदान दिले. प्रमोद नागापुरे यांची आई बहिणाबाई नामदेव नागापुरे हिचे 4/3/2024 ला दुःखद निधन झाले होते. आईचा तेरवीचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने करायचा असे प्रमोदनी ठरविले. त्या नुसार करून जिल्हा. परिषद शाळा येथील विद्यार्थी, कृषक विद्यालय येथील विद्यार्थी, कोटगांव येथील अंगणवाडी येथील चिमुकली मुलं यांना आमंत्रित केले. तसेच गावातील निमंत्रीत व रिस्तेदार यांना आमंत्रीत करून या सर्वांना भोजनदान देण्यात आले. अनेकदा समाजात तेरवी ही सुद्धा प्रतिषठेची असते. परंतु प्रमोद नागापुरे यांनी वेगळ्या पद्धतीने आईची तेरवी केली. या उपक्रमाची सद्या चर्चा आहे. प्रमोद नागापुरे हा नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. नोकरी वरोरा येथे असूनही गावासी नाळ जोडली आहे. नाहीतर अनेकजण असे आहेत की गावाशी संबंध ठेवत नाही. गावात सुद्धा शाळेला भेटवस्तू देणे. वृक्ष लागवड करणे. बुक, पेन्सिल भेट देणे असे विविध उपक्रम राबवत असतो. आईच्या तेरवीला बगल देऊन शालेय विद्यार्थ्यांना भोजनदान देणे हा सुद्धा वेगळा आदर्श समाजात ठेवला.
0 Comments