चंद्रपूर लोकसभा निवडणूक l प्रचारतोफा थंडावल्या, १९ ला मतदान l जिल्हा प्रशासन सज्ज
जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. चंद्रपूर मतदारसंघात भाजप महायुतीचे सुधीर मुनगंटीवार, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, बंचितचे राजेश बेले, बसपाचे राजेंद्र हरिशचंद्र रामटेके जनसेवा गोंडवाना पार्टीचे अवचित सयाम, जय विदर्भ पार्टीचे अशोक राठोड, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे नामदेव शेडमाके, बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीच्या पोर्णिमा घोनमोडे, अखिल भारतीय मानवता पक्षाच्या बनिता राऊत, सनमान राजकीय पक्षाचे विकासा लसंते, भीमा सेनेचे विद्यासागर कासर्लावार, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे सेवकदास बरके, अपक्ष दिवाकर उराडे, मिलींद दहीवले, संजय गावंडे हे उमेदवार रिंगणात आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात ४८ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. छाननीत ३३ नामनिर्देशनपत्र अपात्र करण्यात येऊन पंधरा नामनिर्देशनपत्र पात्र करण्यात आले. ३० मार्च रोजी चिन्ह वाटप झाले. त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी उडाली होती.
बासाठी सोशल मिडियासह प्रचारसभा, बैठका घेण्यात आल्या, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रभारी रमेश बेनीथला, बंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ गटनेते बाळासाहेबथोरात, काँग्रेसचे कन्हैय्याकुमार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री छगन भुजबळ, भाप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ
जिल्ह्यात आदर्श आचार संहिता व निवडणूक खर्च पथकांची स्थापना करण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण ४२ फिरते निगराणी पथक (एफ.एस.टी) ६२ स्थायी निगराणी पथक (एस.एस.टी.) २९ व्हिडीओ निगराणी पथक (व्ही. व्ही.टी) ९ व्हिडिओ पाहणी पथक (व्ही.एस.टी.) ६ खर्च पथक आणि ६ खर्च सनियंत्रक पथक स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात बीयू सयंत्र २६१०, सीयु सयंत्र २६१० आणि व्ही-व्हीपेंड दोन हजार ८१८ वितरित करण्यात आले आहेत. मतदान केंद्राध्यख म्हणून २४५३, प्रथम मतदान केंद्र अधिकारी २४५३, इतर मतदान अधिकारी ४९०५ असे एकूण ९८११ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने १०९ जीप, १९१ बस, ७९ मिनीबस अशी एकूण ३७९ वाहने आरक्षित करून ठेवण्यात आली आहेत.
मार्च रोजी लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला. त्यानुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक १९ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्णतयारी केली आहे. या क्षेत्रात चंद्रपूर, राजूरा, बल्लारपूर, वरोरा,वणी आणिआर्णी या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण ९८ लाख ३६ हजार ३१४ मतदार आहेत. यात ९ लख ४५ हजार २६ पुरुष मतदार, तर ८लाख ९१ हजार २४० स्त्री मतदार आणि इतर ४८ जणांचा समावेश आहे.
0 Comments