जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर: जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करीत लाखोंचे चोर बीटी बियाणे पकडले आहे.
पहिल्या कारवाईत 15 मे रोजी रात्रीच्या सुमारास मौजा नवेगाव तालुका पोम्भूर्णा येथे गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद पक्क्या घरात धाड मारीत त्याठिकाणी चोर बीटी कापूस बियाणे एकूण 80.30 किलोग्राम किंमत एकूण 2 लाख तीन हजार सहाशे चाळीस रुपयांचे जप्त करण्यात आले.
दुसऱ्या कारवाईत 16 मे रोजी रात्री मौजा भीमनी येथे गुप्त माहितीच्या आधारे नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतातील घरात चोर बीटी कापूस बियाणे एकूण 39.88 क्विंटल एकूण किंमत 76.57 लाख रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई 17 मे पहाटे पर्यंत सुरूच होती.
दोन्ही कारवाई मध्ये एकूण 79 लाख 60 हजार सहाशे चाळीस रुपयांचे चोर बीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, चंद्रशेखर कोल्हे, लकेश कटरे, श्रावण बोढे, महेंद्र डाखरे, विवेक उमरे, चंद्रकांत निमोड, जुमनाके आदींनी केली.
*लागोपाठ तिसरी कारवाई जुनगाव ; तालुक्यातील तिसरी कारवाई*
तालुक्यातील जुनगाव येथील घरात अनाधिकृत चोर बिटी कापूस बियाणे विक्री नाठी घरी बाळगले असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या भरारी थकाने धाड टाकून जप्त कले. यात १७ किलोग्रॅम चोर बेटी ज्याचे मुल्य बत्तीस हजार महाशे चाळीस रुपये किंमतीचे बियाणे ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई बालुक्यातील तिसरी कारवाई असून पोंभूर्णा तालुका आता चोर बिटी विक्री करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे.
अनाधिकृत चोर बिटी कापुस बियाण्यास शासनाची परवानगी सतांना पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव येथे छुप्या मार्गाने चोर बिटी बियाणे शेतकऱ्यांना विक्री करून फसवणूक केली नात असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळताच दि.२३ मे गुरूवारला जुनगाव येथील एका घरात १७ किलोग्रॅम चोर बिटी कापूस बियाणे ज्याचे मुल्य बत्तीस हजार सहाशे चाळीस रुपये भरारी पथकाच्या माध्यमातून पकडण्यात आले. व संबंधीत विक्री करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. गणेश शेषराव आखरे रा. जुनगाव व जनार्दन नागाजी घोडे रा. देवाडा बु. यांचेवर अनाधिकृत बियाणे बाळगणे, विक्री करणे बाबत पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा विभागीय कृषी बेमु सहसंचालक शंकरराव तोटावार, कृषी विकास ब्रिम अधिकारी वीरेंद्र राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समिती पोंभूर्णा कृषी अधिकारी नितीन धवस, मंडळ कृषी घेत अधिकारी संतोष कोसरे, कृषी उद्य पर्यवेक्षक नेताजी निय वाकुडकर, पोलीस हवालदार सुनील कुळमेथे यांनी कारवाही केली.
0 Comments