Ticker

6/recent/ticker-posts

प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळले चिंतलधाबा येथील घटना ; मृत्यूचे कारण अस्पष्टआ


 प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळले

चिंतलधाबा येथील घटना ; मृत्यूचे कारण अस्पष्टआ

आत्महत्या की हत्या लोकांमध्ये संभ्रम कायम!

पोंभूर्णा ऐवजी चंद्रपूरात करण्यात आले फाॅरेन्सीक शवविच्छेदन

जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर:-दिड वर्षांपासून प्रेमाच्या आणाभाका घेतलेले दोन्ही विवाहीत प्रेमीयुगुलांचे अखेर शेतशिवारात संशयितरित्या मृतदेह सापडले.सदर घटना दि.२७ मे सोमवारला सात वाजताच्या सुमारास निदर्शनास आली.रुपेश मधुकर मिलमिले वय (३२), रा.चिंतलधाबा, व शशिकला खुशाब कुसराम वय (२७) रा.भटारी असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे.


भटारी येथील शशिकला कुसराम हि आपल्या नवऱ्यापासून विभक्त राहत होती.तर रुपेश ने दिड वर्षांपुर्वी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता.रुपेश भाजीपाला विक्रीसाठी भटारी येथे जात होता.यादरम्यान त्यांचे सुत जुळले.दोघांचेही एकमेकावर प्रेम होते.घटनेच्या दिवशी दुपारी शशिकला व रुपेश हे दोघेही गणेश मिलमिले यांच्या शेतशिवाराकडे गेले.व दोघांनी आपली जीवनयात्रा संपवली.रुपेशचा शव हा विहिरीत तर शशीकला हि विहीरीच्या बाजूला मृतावस्थेत आढळले.सदर घटनेची माहिती पोंभूर्णा पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र दि.२८ मे च्या सकाळच्या चार वाजेपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते.अचानक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मृतक दोघांचेही मृतदेह फाॅरेन्सीक मेडीसिन टाॅक्सीकोलाॅजी शवविच्छेदनसाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले.शेवटी दि.२८ मे ला दुपारी ३ वाजताच्या दरम्यान दोघांचेही शवविच्छेदन करण्यात आले.मात्र पोंभूर्ण्यात शवविच्छेदन न झाल्याने घटनेला एक वेगळे वळण मिळाले आहे.सदर घटना हि आत्महत्या आहे की हत्या याचा तपास करणे पोलिसांसाठी आवाहन राहणार आहे.
घटनेचे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर, अंमलदार नैताम,हवालदार राजकुमार चौधरी करीत आहेत.

वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार पोंभूर्णा येथे शवविच्छेदन न करता चंद्रपूरला दोन्ही मृतदेह हलविण्यात आले.फाॅरेन्सीक मेडीसिन टाॅक्सीकोलाॅजी एक्सपर्ट च्या उपस्थितीत दि.२८ मे ला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान शवविच्छेदन करण्यात आले.

दोघांचे शव हे संशयास्पद आढळून आले असल्याने.सदरची घटना आत्महत्या आहे की हत्या यांची चौकशी पोलिसांसाठी आवाहन आहे.पोलिसांच्या चौकशीतून पुढे काय समोर येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

शशिकला ही मागील दोन वर्षांपासून आपल्या नवऱ्यापासून विभक्त राहत होती.तर रुपेश हा दिड वर्षांपूर्वी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेला होता असे म्हटले जात आहे.

Post a Comment

0 Comments