पाणीटंचाईग्रस्त चेकठाणामध्ये वाहतोय माणुसकीचा झरा!
▪️शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे टँकरद्वारे करीत आहे पाणी पुरवठा
जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर:-पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणा येथील भूगर्भातील पाण्याची पातळी आटल्याने विहीर,हातपंप व नळाद्वारे होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला. त्यामुळे गावातील लहानग्यांपासून ते वयोवृद्धांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.
या गावाला भीषण टंचाईला समोर जावे लागत आहे.याबाबत गावातील शिवसेना कार्यकर्ते यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना माहिती देताच या तहानलेल्या चेकठाणावासीयांसाठी पाणीपुरवठा करण्याचा शब्द देत तत्काळ स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.
चेकठाणा गावापासून चार - पाच किमी अंतरावर वैनगंगा नंदी आहे,त्या नदिवरून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु नदी कोरडी पडली आहे. या नदी वर अवलंबून असलेली पाणी पुरवठा योजना बंद पडली व गावात असणारे विहिरी, हातपंप ला पाणी येत नाही. त्यामुळे गावांमध्ये भिषण पाणी टंचाई आहे. असे असताना सुद्धा ग्रामपंचायतने कुठली उपयोजना केली नाही.गावात ग्रामसेवकांचे दर्शन दुर्लभ असून ग्रामसेवक मुल ला असतात. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गावातील पाणी टंचाईची समस्या गावातील शिवसैनिक जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना सांगताच उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गिऱ्हे हे टंचाईग्रस्त गावाच्या मदतीला धावून आले आहेत. स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे.या उपक्रमाचा गावासह परिसरात कौतुक केल्या जात आहे.
0 Comments