Ticker

6/recent/ticker-posts

मनुष्याच्या दैनंदिन जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा आवश्यक - गुणवंत मिसलवाड


मनुष्याच्या दैनंदिन जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा आवश्यक - गुणवंत मिसलवाड


नांदेड- आजच्या या धकाधकीच्या जीवनाच्या आधुनिक काळात मनुष्य पैशाच्या मागे धावत असून स्वतःच्या शरीराकडे माणूस दुर्लक्ष करीत आहे, म्हणून स्वतःच्या व इतरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलीत ठेवण्यासाठी योगा हा आवश्यक आहे. असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपा) नांदेड आगार येथे दि. २१ जून २०२४ शुक्रवार रोजी १० वा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले की, योग दिनाचे ध्येय व उद्दिष्टे बघितले तर सर्व जनतेचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे आणि जीवन योगमय करणे हेच या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्दिष्ट असून समाजातील सर्व स्थरापर्यंत योगाचा प्रचार आणि प्रसार करणे आणि त्याचे फायदे जाणून घेणे ही काळाची गरज बनली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी बसस्थानक प्रमुख मा.श्री. यासीन हमीद खान यांनी योगाविषयी आपले विचार मांडले व कामगार- कर्मचाऱ्यांना योगाचे धडे दिले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, कामगार नेते रघुनाथराव वाघमारे, आगार लेखाकार सतीश गुंजकर, पाळीप्रमुख मनोहर माळगे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वाहतुक नियंत्रक कमलकिशोर बियाणी, राजेंद्रसिंघ चावला, जगन्नाथ ढगे, बलजीतसिंघ मेजर, विजय बसवंते, कैलास बाळस्कर, हेड कॅशिअर सुमीत महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी आगारातील कामगार कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगा केला.

Post a Comment

0 Comments