पोंभुर्णा:-तालुक्यातील फुटाणा मोकासा येथील वीस वर्षीय तरुण अचानक घरून बेपत्ता झाल्याने आई-वडिलांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली आहे.
धनराज बंडू भीमनवार वय अंदाजे वीस वर्ष हा तरुण दिनांक 11 जून 2024 रोजी घरी आई-वडिलांना काहीही न सांगता सकाळी दहा अकरा वाजता ची सुमारास घरून निघून गेला. सायंकाळ होऊ नये मुलगा घरी परत आला नसल्याने आई-वडिलांची धाकधूक वाढली. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली मात्र गावात कुठेच त्याचा शोध लागला नाही. नातेवाईकांकडे फोन द्वारे विचारणा केली असता कुठेच त्याचा पत्ता लागलेला नाही.
वरील छायाचित्रात दिसणारा तरुण कुणाला आढळल्यास 7620948848 / 77418 17498 या नंबर वर कळवावे अशी विनंती आई वडिलांनी केली आहे.
0 Comments