गावात पसरली शोक कळा ।सर्वत्र हळहळ व्यक्त
विजय जाधव, तालुका प्रतिनिधी
मुल : तालुक्यातील बोंडाळा खुर्द येथील श्रीमती येल्लु बाई बांगरे यांचा दिनांक 1 जुन 2024 ला वृद्धापकाळमुळे मृत्यू झाल्याने नातेवाईक म्हणून साईनाथ राघो आभारे मुक्काम नागपूर (सोणापूर) तालुका चामोर्शी हे मयतीसाठी बोंडाळा खुर्द येथे आले होते. उशीर झाल्याने अंत्यविधी आटोपून त्यांनी देवाळा बुद्रुक येथील आपले नातेवाईक श्री शरद बांगरे यांचे कडे जाऊन मुक्काम करून दुसऱ्याच दिवशी आपले स्वगावी जाण्याच्या हेतूने परतिच्या मार्गावर असताना देवाडा बुज.जवळच्या टर्निंग वर मोटारसायकलने जात असताना अचानक त्यांचा अपघात झाला. या अपघातात ते जागीच गतप्राण झाले.
ही घटना दिनांक २ जूनला रात्री साडेअकराच्या दरम्यान घडल्याचे प्राप्त माहितीनुसार कळते. सदर घटनेची माहिती होताच नातेवाईकांनी पोलिसांना माहिती देऊन प्र
मृतदेह पंचनामा करून मृतक साईनाथ चा मृतदेह शवाविच्छेदनाकरिता मुल येथे पाठवण्यात आला.
मृत्यू समय त्यांचे वय अंदाजे 38 ते 40 वर्ष होते. त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुलं व एक मुलगी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.
घरातील एक कर्ता पुरुष अचानक काळाने हिरावून नेल्याने कुटुंबीयांवर फार मोठे आर्थिक संकट कोसळले असून गावात व नातेवाईकांमध्ये सर्वत्र शोककळा पसरली आहे. अत्यंत सुस्वाभावी, मनमिळावू, सर्वपरिचित साईनाथवर काळाने झडप घातल्याने संपूर्ण कुटुंब दुःख सागरात बुडाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच दरारा 24 तास न्यूज पोर्टलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..... 🙏🙏🙏
0 Comments