पोंभूर्णात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बुथ प्रमुखांची बैठक संपन्न
पोंभूर्णा: पोंभूर्णा येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या बुध व बिएलओ प्रमुखांची बैठक संत जगनाडे महाराज सभागृह येते घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील ५१ बुध प्रमुख व बिएलओ प्रमुखांची व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
आगामी विधानसभा निवडणुकीच्यां अनुषंगाने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी बुध, बिएलओ व गावप्रमुखांना सर्वांना पक्ष संघटन विस्तार व बुध सक्षम करण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका प्रमुख तथा नगर पंचायतचे विरोधी पक्षनेता आशिष कावटवार व शहर प्रमुख तथा नगरसेवक गणेश वासलवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील प्रत्येक गावात,वार्डात,प्रभागात शिवसेनेचा कार्य,चिन्ह पोहचवा व समस्या विरुध्द उठाव करा शिवसेनेचा ब्रीद ८०% समाजकारण व २०% राजकारण या प्रमाणे करा असे बैठकीत आवाहन करण्यात आले.यावेळी नगरसेवक बालाजी मेश्राम,युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार, उपतालुका प्रमुख रवींद्र ठेंगने,घनोटीचे सरपंच पवन गेडाम, वेळवाचे सरपंच जितेंद्र मानकार,उपसरपंच अतुल जाधव,किशोर डाखरे, विलास बुरांडे,नीलकंठ सूरजागडे,सुनील दिवसे, दतू मोरे व तालुक्यातील शिवसेना पक्षाचे सरपंच,उपसरपंच,सदस्य व नगरसेवक,पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
0 Comments