Ticker

6/recent/ticker-posts

मान्सूनचं महाराष्ट्रात जोरदार आगमन, अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस


मान्सूनचं महाराष्ट्रात जोरदार आगमन, अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस

चंद्रपूर:- महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर सगळीकडेच चांगला पाऊस होताना दिसत आहे. चांगली सुरुवात होत असल्याने शेतकरी राजा देखील सुखावला आहे. अनेक ठिकाणी पेरणीच्या कामांची सुरुवात होणार आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या लोकांना देखील दिलासा मिळत आहे.

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती जोरदार पावसाची. अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. शहरी भागात देखील पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याच्या अनेक भागात आज दिनांक ११जुन रोजी रात्री ११ वाजता पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडासह पाऊस पडत आहे.उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पोंभुर्णा तालुक्यासह देखील पावसाने जोरदार हजेरी लावलीये. गेल्या तासाभरापासून पावसाची बॅटिंग सुरु आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. पाणी साचल्यानं अनेकांची धावपळ झाली. पावसाचा जोर कायम असल्यानं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.

पोंभुर्णा शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे.रात्री ११ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांची सुटका झाली. तर बळीराजा सुखावला आहे. सध्या शेतीची मशागत सुरू असून शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे.

वेळेवर पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिसरात होत असलेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मे महिन्यात लागवड केलेल्या पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे. शहरात आणि परिसरात उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

Post a Comment

0 Comments