Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर जिल्ह्यात घोंगावतेय संदीप गिर्हे नावाचं वादळ! बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मुसंडी, भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश



बल्लारपूर प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्ह्यात व विशेष करून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांचे नेतृत्व क्षेत्रातील जनसामान्य माणसांना भावले असून त्यांच्या नेतृत्वात अनेक भाजपच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.


काल दिनांक 19 जुलै रोजी बल्लारपूर तालुक्यातील कवडजई या गावच्या माजी उपसरपंच सौ. कल्पना कुकुडकर यांनी त्यांच्या अनेक समर्थक, कार्यकर्त्यांसह संदीप भाऊ गिर्हे यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.


 यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिक्की भैय्या यादव, तालुकाप्रमुख प्रकाश पाठक, शहर प्रमुख बाबा साहू, युवासेना नेता प्रशांत गडला, मुकद्दर भाई, महादेव लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते. माजी उपसरपंच  कल्पना कुकुडकर, संदीप कुकुडकर, वेदांत कुकुडकर, श्रीराम उपरे, गणेश रुपेश जुवारे, गणेश नैताम, प्रकाश बद्दलवार, राकेश, बंडूभाऊ,इत्यादींनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपला चारी मुंड्या चित करून इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा भारदोष मतांनी विजयी झाला. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणखीनच बळ संचारलेला आहे.


 बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात प्रत्येक गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची ताकद वाढलेली आहे गावागावात शाखा निर्माण झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारलेला आहे.
बल्लारपूर तालुक्याच्या उशाशी असलेल्या या गावात अनेक वर्षापासून भाजपचे बाहुबल्य होते. आता मात्र शिवसेनेच्या मुसंडीमुळे भाजपची दैना झाली आहे. 
या पक्ष प्रवेश सोहळा निमित्त गावातील बहुसंख्य कार्यकर्ते महिला पुरुष व तरुण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments