तालुक्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा गड ध्वस्त!
राहुल पाल यांनी एकमेव गड राखला कायम! जून गावात भाजपला भरघोस मतदान
पोंभुर्णा:-लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी असे समीकरण थेट पाहायला मिळाले. पोंभोर्णा तालुका भारतीय जनता पक्षाचा गड मानल्या जातो. भारतीय जनता पक्षाला या तालुक्यातून उत्स्फूर्त पाठिंबा असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा करिष्मा कमी झाला आणि एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला राहिलेला तालुका विरोधात गेला.
याचा अर्थ असा काढता येऊ शकतो की भारतीय जनता पक्षाची ताकद आता पक्ष कार्यकर्त्यांच्या वागणुकी मुळे कमी झाली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
आणि अशा प्रतिक्रिया वस्तू स्थितीला धरून आहेत. कारण पक्ष वाढीसाठी व जनाधार टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेशी नाळ जुळवून ठेवली नाही. केवळ मोठमोठे पदे स्वतःकडे लाटून स्वतःच्या फायद्या शिवाय दुसरं काहीही केल्याचे दिसत नाही. पक्ष वाढीसाठी सुधीर भाऊंनी सांगितलेल्या कानमंत्रांचा कार्यकर्त्यांनीच अवहेलना केली. पोंभूर्ना शहरात डझनभर कार्यकर्ते सुधीरभाऊचे नावं सांगून अनेक कामे पार पाडत असले तरी त्यांची नजर केवळ तालुकाध्यक्ष पदाकडे लागून आहे. परंतु त्यांना सुद्धा पोंभुर्णा मध्ये खच खावी लागली.
तालुक्याचे वर्षानुवर्ष नेतृत्व केलेल्या व सभापती राहिलेल्या अलकाताई आत्राम यांच्या भीमनी या गावात सुद्धा खूप मोठी हानी झाली आहे. या गावात सुद्धा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना 534 तर सुधीर मुनगंटीवार यांना 292 मते मिळाली.यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत. एकूण झालेल्या मतदानापैकी येथे 534 काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला, तर सुधीर मुनगंटीवार यांना 292 मते मिळाली. पोभुर्णा शहराचा कायापालट करणाऱ्या शहरात पाचही मतदान केंद्रांवर भारतीय जनता पक्ष मागे तर काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे.
याउलट कुठलेही मोठे पद किंवा पक्षाकडून हाव नसलेला राहुल पाल एक तळमळीचा कार्यकर्ता, पक्षाचे निष्ठेने कार्य करत राहिला. आणि सुधीर भाऊंचा गड राहिलेला जुनगाव येथे भरभरून मतदान भारतीय जनता पक्षाच्या बाजूने करून घेतले. तालुक्यात एकमेव हे असे उदाहरण आहे की ज्या ठिकाणात भारतीय जनता पक्ष काँग्रेस पक्षाच्या कितीतरी पुढे आहे. ही केवळ आणि केवळ जूनगावचे विद्यमान प्रभारी सरपंच राहुल पाल यांच्या कार्यपद्धतीचे फळ आहे. असे म्हटले तरी वावगे ठरू नये. झालेल्या 804 मतदानापैकी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना 492 तर कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना 275 मते मिळाली.
भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने या बाबींचा आत्मचिंतन करायला हवा. तालुक्यात पक्षाने नेतृत्वात बदल केल्यास पक्षाला पुन्हा नवसंजीवनी मिळू शकते असा जाणकार अंदाज काढत आहेत. विधानसभा निवडणूक जेमतेम तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने भाजपच्या नेतृत्वाने तालुक्यात नेतृत्व बदल करणे आवश्यक आहे असे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.अन्यथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघही शाबूत ठवने कठीण जाऊ शकते.
0 Comments