कार्यकर्ताओं का आभार। अब की बार नया आमदार।काँग्रेसीयों का निर्धार
चंद्रपुर। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 60000 पेक्षा जास्त अशा प्रचंड मताधिक्याने काँग्रेस उमेदवार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर या विजयी झाल्या. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला भरभरून जनतेचे प्रेम मिळाले. त्यामुळे बल्लारपूर आणि बल्लारपूर ग्रामीण कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकदंत लान बल्लारपूर येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता आभार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत 400 ते 500 कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर चे माजी नगराध्यक्ष काँग्रेस नेते घनश्याम मूलचंदानी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शंतनु धोटे, बल्लारपूर ग्रामीण अध्यक्ष गोविंदा उपरे, शहर अध्यक्ष करीम भाई, भास्करजी माकोडे, राजू झोडे, प्राध्यापक दिलीप चौधरी, वागदरकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेऊन काँग्रेसला प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून दिला. हिच शक्ती आणि ताकद बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीत दाखवावी. व भारतीय जनता पक्षाचे सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत करण्याचा चंग बांधण्यात आला. कार्यकर्त्यात प्रचंड उत्साह दिसून येत होता. "अबकी बार बल्लारपूर का नया आमदार" अशा घोषणा देऊन एकदंतलान कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह, चैतन्य दिसून येत होता.
0 Comments