Ticker

6/recent/ticker-posts

बल्लारपूर विधानसभेसाठी अहिरकर सज्ज! वाढदिवसानिमित्त छत्री वाटप कार्यक्रमाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या...काँग्रेस प्रबळ दावेदार!चाहूल विधानसभा निवडणुकीची ..

बल्लारपूर विधानसभेसाठी अहिरकर सज्ज!

  वाढदिवसानिमित्त छत्री वाटप कार्यक्रमाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या...

काँग्रेस प्रबळ दावेदार!चाहूल विधानसभा निवडणुकीची ..


बल्लारपूर:- विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली, तस तशी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधनीला सुरुवात केली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे सुधीर मुनगंटीवार यांचे कडे आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जिद्द संचारलेली दिसत आहे. नामदार सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत करणे सोपी गोष्ट नाही. तरीसुद्धा या निवडणुकीत नक्कीच फेरबदल होणार आणि काँग्रेस ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पहावयास मिळत आहे. या विधानसभेसाठी काँग्रेस कडून अनेक दावेदार आहेत. अनेक काँग्रेसचे दिग्गज उमेदवारी मलाच मिळेल, यासाठी प्रयत्नरत आहेत. यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, विनोद अहिरकर हे सुद्धा या विधानसभेसाठी तयारीला लागले आहेत. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नुकताच 3000 छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी विनोद अहिरकरच काँग्रेसचे प्रबळ दावेदार असल्याचे बोलून दाखविले आहे. येणारा काळच सांगेल की बल्लारपूरचा आमदार कोण होणार? byuro reporte vainganga News Live Network... कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, लाईक, शेअर, कमेंट जरूर करा.... धन्यवाद!

Post a Comment

0 Comments