चंद्रपूर: काही दिवसांपूर्वीच पुण्यात भरधाव वेगात आलिशान पोस्ट कार चालवत एका अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच तशीच काहीशी घटना नागपुरातही घडली. त्यानंतर आता तंतोतंत तशीच घटना चंद्रपूर जिल्ह्यातील देवाळा बुद्रुक- नांदगाव मार्गावर सोमवारी रात्री घडली.
पोभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील खुशाल पाल व त्यांचा नातेवाईक विलास संदोकार राहणार बोडदा (मुडझा)हे दोघे दुचाकीने शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्याच्या हेतूने नांदगाव कडे जात होते. दरम्यान नांदगाव कडून देवाडाकडे येणाऱ्या कारने दुचाकीस जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या आहेत. खुशाल मारुती पाल राहणार जुनगाव व विलास संदोकार राहणार बोडदा (मुळझा) तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर अशी जखमींची नावे आहेत. विलास संदोकार यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत.
विशेष म्हणजे कारचालक हे देवाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत.
एकीकडे पुण्यातील अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असताना चंद्रपूर जिल्ह्यातही अशा घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाई सुरू केली असल्याचे समजते.
0 Comments