Ticker

6/recent/ticker-posts

ब्रेकिंग न्यूज 
नांदगाव मुल येथे इसमाची विहिरीत उडी घेऊन आ
त्महत्या

मुल पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या बेंबळ पोलीस दुरुक्षेत्राच्या हद्दीतील नांदगाव येथे आज सोमवारी आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. नांदगाव वरून फुटाणा कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत 65 ते 70 वर्षीय इसमाने आत्महत्या केली.
जनार्धन विठोबा पोरटे वय अंदाजे 70 वर्ष असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

कालपासून हे गृहस्थ घराबाहेर निघाले तेव्हापासून ते घरी आले नाही. त्यांचा शोधा शोध घेतला असता कुठेच थांब पता लागला नाही. आज सकाळपासूनच त्यांची शोध मोहीम सुरू होती. अशातच नांदगाव फुटाणा जाणाऱ्या मार्गावर विहिरीत गळ टाकून पाहिले असता गळाला लागून त्यांचे मृतदेह वर आले. माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळावर गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असल्याची माहिती उपस्थितांनी सांगितली. वृत्तलेपर्यंत पोलीस घटनास्थळावर उपस्थित झाले नव्हते. सदर इसमाने आत्महत्या का केली हे मात्र बोलत असतात. पोलीस तपासात आत्महत्येचे कारण उघडकीस येईल.

Post a Comment

0 Comments