Ticker

6/recent/ticker-posts

माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तालुका मुल च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक साहित्य वाटप

"माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना" तालुका मुल च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक साहित्य वाटप

दरारा 24 तास न्युज नेटवर्क 

     मुल। आपल्या विविध सामाजिक उपक्रमातून लोक हिताचे कार्य करण्यास सदैव अग्रेसर असलेल्या "माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तसेच इंडिया२४ न्युज" तालुका मुल च्या सौजन्याने मा. तुळशीराम जांभूळकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा मुल (विहिर गांव) व उश्राळा येथील विद्यार्थ्यांना शालेय नोटबुक वाटप करण्यात आले. नोटबुक मिळाल्यामुळे विद्यार्थी आनंदीत होऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. 

        या प्रसंगी डॉ. आनंदराव कुडे कार्यकारी अध्यक्ष तालुका मुल, श्री प्रविणभाऊ भरतकर मुल शहर अध्यक्ष, मा. पिंपरी मॅडम गटशिक्षणाधिकारी पं. स. मुल श्री कोरडे सर केंद्र प्रमुख, श्री प्रविण गोहने जनसंपर्क प्रमुख मुल तालुका, श्री संजयभाऊ चिटमलवार मुल शहर सचिव, श्री देशकर सर मुख्याध्यापक उश्राळा, श्री आत्राम सर स. शिक्षक उश्राळा, श्रीमती सोनुले मॅडम मुल (विहिर गांव) सौ. सपना ताई गेडाम मुल तालुका महिला सचिव, श्रीमती कुंदाताई मेश्राम जनसंपर्क प्रमुख महिला मुल तालुका, अकुंश बावने, सौ. अंकीता चादरी, सौ स्नेहा बावने उश्राळा तसेच इतर पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सपना ताई गेडाम यांनी केले. व आभार प्रदर्शन श्रीमती सोनुले मॅडम मुख्याध्यापिका यांनी केले.

Post a Comment

0 Comments