चिचपल्ली येथील गावात मामा तलाव फुटल्यामुळे २०० घरांमध्ये शिरले पाणी, जनावरेही वाहून गेली!
चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी)
संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक - गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे २०० घरांमध्ये पाणी शिरले.त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने त्वरित मदत कार्य पोहचवून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष काँग्रेस नेते विनोद अहिरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.जिल्हा परिषद निधीतून प्रत्येक कुटुंबाला १०००० रूपयाची तात्काळ मदत करावी असे निवेदनात म्हटले आहे.
चंद्रपूर येथील चिचपल्ली गावाची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावे व त्यांना तात्काळ गरजू सेवा उपलब्ध करून द्याव्यात.तसेच चिचपल्लीसह जिल्ह्यातील ज्या भागात नुकसान झाले आहेत. त्या ठिकाणचे पण त्वरित पंचनामे करून त्यांना मदत करावी असेही विनोद अहिरकर यांनी आवाहन केले आहे.
0 Comments