Ticker

6/recent/ticker-posts

जूनगाव येथील शेतकऱ्याचे कागदपत्र एसटी बस मध्ये विसरले

जूनगाव येथील शेतकऱ्याचे कागदपत्र एसटी बस मध्ये विसरले


पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी

सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना आपल्यापैकी अनेकांनी अनेक गोष्टी गमावल्या आहेत. पाकीटापासून छत्र्यांपर्यंत पिशव्यांपासून ते पाण्याच्या बाटल्यांपर्यंत, आणि काय नाही; आम्ही आमचे बरेच सामान ऑटो, बस, ट्रेन आणि अशा वाहतूक सुविधांमधून उचलायला विसरलो आहोत. अलीकडेच एका शेतकऱ्याने सोबत बरेच सामान असल्यामुळे सामान घेऊन उतरताना महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी उचलायला विसरले. महत्त्वाची कागदपत्रे असल्यामुळे त्यांची धांदल उडाली आहे.


ही घटना आहे आज सोमवारी सायंकाळी पाच वाजताची आहे.पोंभुर्णा ते जुनगाव या बस मध्ये जूनगाव येथील शेतकरी वसंत केशव येलमुले हे नांदगाव वरून बसले. जूनगाव येथे उतरताना काही सामान घेऊन कागदपत्रे असलेली पिशवी उचलण्यास विसरले. विसरलेल्या पिशवीत घरच्या सर्व लोकांचे आधार कार्ड, बँक पासबुक, व इतर कागदपत्रे असल्याचे येलमुले यांनी सांगितले. 

कागदपत्रे परत कसे मिळतील या विवंचनेत ते जूनगाव येथील माजी सरपंच जीवनदास गेडाम यांच्याकडे गेले. तिथे त्यांनी आपली व्यथा कथन केली. यावर माजी सरपंच गेडाम यांनी एसटी महामंडळाच्या पोंभुर्णा येथील कार्यरत असलेले भोयर यांच्याशी  फोनवर संपर्क केला. मात्र अनेकदा फोन करूनही श्री भोयर यांनी फोन उचलला नाही. मुल येथील बस स्थानकात फोन केला असता तेथील फोन डेड असल्याचे लक्षात आले. त्यानंतर टोल फ्री नंबर वर संपर्क साधून चंद्रपूर आणि गडचिरोली डेपोचा नंबर मिळविला. संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी टोल फ्री नंबर वर फोन लावून चंद्रपूर आगाराचा आणि गडचिरोली आगाराचा नंबर घेतला. परंतु काही कारणामुळे नंबर लागले नाही. त्यामुळे ज्यांना कुणाला ही पिशवी मिळेल आणि बसच्या वाहकाला विनंती आहे की, ही पिशवी त्यांना आढळल्यास सांभाळून परत करावे. त्यांनी कृपया परत करावे अशी विनंती वसंत येलमुले यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments