✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430
भिसी दि.२० : १६ ऑगस्ट
२०२४ ला शहीद स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले असता, यावेळी गजानन गुळधे, सुभाष नन्नावरे, महाराष्ट्र राज्यध्यक्ष विद्यार्थी संघटना संदीप धारने संशोधन प्रमुख, रणजित साव साकडे चिमूर अध्यक्ष विद्यार्थी संघटना, शंकर नन्नावरे महाराष्ट्र सदस्य विद्यार्थी संघटना यांनी भेट घेवून अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्या समस्येबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या 'चे सोबत महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम २००० मध्ये सुधारणा करण्याबाबत आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन याचे पत्र दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ला निर्गमित झाले हे पत्र अनुसूचित जाती, जमाती भटक्या जाती व इतर मागासवर्गीय या 'च्यावर अन्याय करणारे आहे. त्यामुळे हे परिपत्रक
राज्यपालाच्या सहीसाठी न
पाठविता रद्द करण्यात यावे. अशी
मागणी व भूमिका यावेळी राहुल
दडमल, सल्लागार तथा माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र राज्य यां- नी मांडले. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र रद्द करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
यासंदर्भात बंटी भांगडिया यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची वेळ मागण्यात आली होती. तसेच राज्याध्यक्ष सुभाष नन्नावरे आ. मा. ज. वि. यु. संघटना महा. राज्य यांनी सुद्धा आमदार समीर कुणावर हिंगणघाट विधानसभा क्षेत्र यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले होते. त्यांनी आदिवासी मंत्री यांच्याशी संपर्क करीत यावर चर्चा करण्याकरिता आपण मंत्रालयात भेटणार आहोत. यावर सकारात् मक चर्चा करू असे आमदार समीर कुणावार यांनी आश्वासित केले होते. उपमुख्यमंत्री भेटी दरम्यान
आमदार बंटी भांगडीया, गजू गुळधे, सुभाष नन्नावरे, महाराष्ट्र राज्यध्यक्ष विद्यार्थी संघटना संदी- प धारने संशोधन प्रमुख, रणजित सावसाकडे चिमूर अध्यक्ष विद्यार्थी संघटना, शंकर नन्नावरे महाराष्ट्र सदस्य विद्यार्थी संघटना आदी उपस्थित होते.
0 Comments