Ticker

6/recent/ticker-posts

तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तहसील कार्यालय चिमूर समोर एकदिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन संपन्न -चिमूर नगर परिषदेचा भोंगळ कारभार मांडला उघड्याबर

तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तहसील कार्यालय चिमूर समोर एकदिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन संपन्न


-चिमूर नगर परिषदेचा भोंगळ कारभार मांडला उघड्याबर

✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
          7887325430

चिमूर : - दिनांक.०२/०८/२०२४ ला चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तहसील कार्यालय चिमूर समोर चिमूर नगर परिषद च्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभार तसेच चिमूर शहरातील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार पिण्याचे पाणी ,विज पुरवठा , रस्ते , नाली बांधकाम ,आरोग्य , शिक्षण , कृषी ,अशा अनेक रास्त प्रलंबित रखडले मुद्दे जनतेसमोर यावे यासाठी एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन दुपारी १२ वाजेपासून तर ५ वाजे पर्यंत करण्यात आले. धरणे आंदोलन संपल्यानंतर चिमूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभाराची चौकशी करण्याबाबत चे निवेदन उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत राष्ट्रपती , राज्यपाल, मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री सुधीर मुंनगट्टीवार,सचिव नगरप्रशासन, विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना संपूर्ण काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये निवेदन देण्यात आले.यावेळी माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर , प्राध्यापक राम राऊत , डॉ.सतीश वारजूकर चिमूर विधानसभा समनव्यक, गजानन बुटके माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव , धनराज मुंगले ओबीसी संघटक महाराष्ट्र प्रदेश, संजय घुटके जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव , राजेश चौधरी स्विय्य सहाय्यक खासदार किरसान, विलास मोहिणकर तालुका सरचिटणीस , प्रदिप तळवेकर पर्यावरण अध्यक्ष, नागेन्द्र चट्टे , रोहन नन्नावरे महासचिव युवक काँग्रेस,केशव वरखडे ,घनश्याम रामटेके ,अरुण दुधनकर , साईश वारजूकर सरपंच शंकरपूर ,नितीन कटारे ,विनोद ढाकुनकर ,साईश वारजूकर सरपंच ,जाबीर कुरेशी , ऍड.धनराज वंजारी ,विवेक कापसे ,राजेंद्र लोणारे ,शहर अध्यक्ष अविनाश अगडे ,पप्पू शेख मीडिया प्रमुख , गुरुदास जुनघरे ,अक्षय लांजेवार ,अक्षय नागरीकर , रामदास चौधरी , अनिल डगवार, मनोज तिजारे ,प्रमोद दाभेकर , श्रीकांत गेडाम , प्रवीण वरगंटीवार ,शार्दूल पचारे , प्रा.चाफले,रत्नाकर विटाळे, माधुरीताई रेवतकर कार्याध्यक्षा महिला काँग्रेस ,माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर , नाजमा पठाण , शैनाज अन्सारी , सुरेखा शेंभेकर व आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments