चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
चंद्रपूर: जिल्हा मध्यवर्ती - सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांचे - संकल्पनेतुन व संचालक मंडळाचे सहकायनि मागील ३ - वर्षापासुन बँकेच्या सेवेतुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा- यांचा सत्कार करण्यांत येत आहे. त्यानुसार यावर्षीही ग स्वातंत्रय दिनाचे औचित्य र साधुन दि. १५ ऑगष्ट २०२४ रोजी बँकेच्या प्रमुख कार्यालयांत बँकेच्या सेवेतुन सेवानिवृत्त झालेल्या २० कर्मचा-यांचा बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत व संचालकांचे हस्ते शॉल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यांत आला.
स्वातंत्र्य दिनानिमित्य प्रमुख * कार्यालयांत बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांचे हस्ते न ध्वजारोहण करण्यांत आले. त्यानंतर प्रमुख कार्यालय व स्थानिक शाखांमधील अधिकारी कर्मचारी यांना याप्रसंगी मार्गदर्शन करतांना - बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांचे कार्याचा उल्लेख करुन बँकेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान असल्याचे मत व्यक्त केले. कर्मचारी कमी असतांना सुध्दा संपूर्ण कर्मचा- यांचे सहकार्याने बँकेच्या नफयात वाढ झालेली असून ३१ मार्च २०२४ ला बँकेला १२ कोटी सकल नफा झालेला आहे. मागील २ वर्षापासुन सहकारी संस्थांना लाभांश देण्यांत आलेला आहे. कर्मचा- यांचे व त्यांचे कुटुंबीयांचे भवितव्य बँकेच्या प्रगतीवर अवलंबुन आहे त्यामुळे कर्मचा-यांनी एकदिलाने काम करून आपणांस बँकेला प्रगतीपथावर न्यावे संचालक मंडळ आपल्या पाठीशी आहे व सदैव उभी राहील अशी ग्वाही दिली बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश्वर कल्याणकर यांनी कर्मचा-यांना मार्गदर्शन करतांना बँकेच्या प्रगतीचा लेखाजोखा सांगुन येणा-या मार्च मध्ये बँकेच्या प्रत्येक कर्मचा-यांनी आपली स्वतःची जबाबदारी समजुन जोमाने कार्य करावे व ठेवी व कर्जवाटप बँकेचा नफा वाढविणे,
कर्जवसुली वाढविणे, एनपीए कमी करणे, यामध्ये भरीव कामगीरी करावी असे सांगीतले. सत्कार कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मा. श्री. डॉ. ललित मोटघरे संचालक, मा. श्रीमती डॉ. प्रभाताई वासाडे संचालिका यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी बँकेत केलेल्या सेवेचा व त्यांचे अनुभव व कार्याबद्यल गौरवोद्वार काढुन त्यांचे कार्याचागौरव केला. या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बँकेचे संचालक सर्वश्री राजेश रघाताटे, प्रा. ललित मोटघरे, संचालिका श्रीमती प्रभाताई द. वासाडे व श्री. राजेश्वर कल्याणकर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख कार्यालय व स्थानिक शाखांमधील कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments