Ticker

6/recent/ticker-posts

पोंभूर्णा तालुक्यातील विहिरगाव येथील बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांनी नागरिकांसोबत साधला संवाद

*पोंभूर्णा तालुक्यातील विहिरगाव येथील बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांनी नागरिकांसोबत साधला संवाद*


पोंभूर्णा तालुक्यातील विहीरगाव येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखा विहीरगाव तर्फे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.संदिपभाऊ गिऱ्हे,शिवसेना तालुका प्रमुख श्री.आशिष कावटवार,चेक ठाणेवासणा ग्रा. पं.सदस्य श्री.वैभव पिंपळशेंडे, सरपंच श्री.पवन गेडाम,श्री.प्रशांतभाऊ मेश्राम,श्री.गोकुळ तोडासे,श्री.जनार्दन सातपुते यावेळी उपस्थित होते.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संदिपभाऊ गिऱ्हे यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या विविध अडचणी,समस्या जाणून घेतल्या त्या पूर्ण करण्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे असा विश्वासही शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संदिपभाऊ गिऱ्हे यांनी दिला. या नागरिक संवाद बैठीदरम्यान श्री.पकज पोहनिकर, श्री.गंगाधर शेडमाके,श्री.आशिष सातपुते, श्री.शिवा शेडमाके, श्री.संजय कुडनेथे,श्री.राजू कुडनेथे,श्री.कवडू भूरसे, श्री.दुर्यधन गव्हारे, सौ.जीजाबाई कोहरे,सौ.उषाताई तलांडे, सौ. रंजीताताई कुडमेथे,सौ पापिताताई गव्हारे, सौ.मायाबाई पोहनीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments