Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची चक फुटाणा येथे बैठक संपन्न - काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांच्या मार्गदर्शनात बैठकांचे सत्र सुरू

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची चक फुटाणा येथे बैठक संपन्न


- काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांच्या मार्गदर्शनात बैठकांचे सत्र सुरू

दरारा 24 तास न्युज नेटवर्क 

पोंभुर्णा: काँग्रेस नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात तालुक्यातील चेक फुटाणा येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आज दिनांक १९ सप्टेंबर 2024 रोजी बैठक घेण्यात आली.

जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संतोषसिंहरावत यांनी काँग्रेस पक्षाच्या बैठकांचे सत्र सुरू केले असून गावागावात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सतत ही आगेकुच सुरूच राहणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी बोलून दाखवले आहे. 

एकेकाळी काँग्रेसच्या बैठकांना खूप मोठा प्रतिसाद मिळायचा आणि प्रत्येक बैठका, शिबिर, सभा गाजायच्या. मध्यंतरी मरगळ आली आणि बैठकांची परंपरा बंद पडली. परंतु लोकसभेच्या प्रचंड यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती आणि एल्गार उफाळून आलेला आहे. त्याचाच भाग म्हणून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी सर्व कामाला लागले असून जनतेच्या समस्या गावागावात जाऊन जाणून घेत आहेत. 

तालुक्यातील चेक फुटाणा येथील बैठकीत युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पवन नीलमवार, उमाकांत मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक व चर्चा पार पडली. या बैठकीला युवक काँग्रेसचे सुरज पिंपळ शेंडे, उदय बोंबळे, दत्ता बोबडे, गंगाधर बोबडे, गणेश अर्जुनकर, अभिषेक अर्जुनकर, नाना अर्जुनकर, नंदू चांदेकर, विजय कावरे, लक्ष्मण शंभरकर तथा इतर पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments