Ticker

6/recent/ticker-posts

बुडून मृत्युमुखी पडलेल्या दिलीप सातपुते यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांनी घेतली सांत्वन पर भेट

बुडून मृत्युमुखी पडलेल्या दिलीप सातपुते यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांनी घेतली सांत्वन पर भेट


दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
मुल: तालुक्यातील दुगाळा येथील ग्रामपंचायत सदस्य व प्रगतशील तरुण शेतकरी दिलीप सातपुते यांचा देवी विसर्जन दरम्यान बुडून मृत्यू झाला. राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते मात्र राजकीय फायदा बघूनच जनतेच्या भेटीगाठी घेतात. इतकी दुर्दैवी घटना घडवून सुद्धा विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून असणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांनी कुटुंबीयांची सांत्वन पर साधी भेट घेतली नाही.


परंतु याला अपवाद ठरत काँग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, बल्लारपूर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे प्रबळ दावेदार, जनतेच्या सेवेत सतत आपले अस्तित्व अर्पण करणारे संतोष सिंह रावत यांनी दिनांक 15 आक्टोबर रोजी मृतकाच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर दिला.

यावेळी त्यांच्या समवेत सरपंच प्रीती भांडेकर, माजी सरपंच बनकर गुरुजी, घनश्यामजी येनुरकर, गुरु गुरनूले इत्यादी कार्यकर्ते व गावातील महिला पुरुष उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments