बल्लारपुरात प्रा. शाम मानव यांचे जाहीर व्याख्यान
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांनी वेगवेगळे माध्यम उपयोगात आणून समाजात पोहोचत आहेत. बल्लारपूर विधानसभा राज्यातच चर्चेची ठरत आहे. याला कारण म्हणजे राज्याचे वजनदार मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना टपून बसली आहे. या विधानसभेत काँग्रेसचा आणि सेनेचा मोठा धबधबा निर्माण झालेला आहे.
काँग्रेस नेते डॉक्टर संजय घाटे हे या विधानसभेत निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवून समाज बांधणीचा विडा उचललेला आहे.
दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी बल्लारपूर येथे संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ या अभियानाखाली प्रख्यात विचारवंत प्राध्यापक श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संजय घाटे हे असून राजे बल्लाळ शाह सभागृह येथे होणार आहे. या जाहीर व्याख्यानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय ओबीसी महापरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments